३० शाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:34 AM2020-12-31T04:34:22+5:302020-12-31T04:34:22+5:30
धानाेरा तालुक्यातील धानाेरा, रांगी, माेहली, दुधमाळा, मेंढाटाेला केंद्रातील ३० जि.प. शाळांमध्ये मागील २ वर्षांपासून इंग्लिश ई-टीच उपक्रम इयत्ता १ली ...
धानाेरा तालुक्यातील धानाेरा, रांगी, माेहली, दुधमाळा, मेंढाटाेला केंद्रातील ३० जि.प. शाळांमध्ये मागील २ वर्षांपासून इंग्लिश ई-टीच उपक्रम इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता सुरू आहे. इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम ॲनिमेटेड पद्धतीने तयार करुन इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना पेनड्राईव्हमध्ये देण्यात आला. शिक्षकांना शाळांमध्ये उपलब्ध एलईडी व संगणकावर हा उपक्रम सुरू केला. मार्च २०२० पासून लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून हा उपक्रम सुरूच ठेवला. मार्चपासून ३० जूनपर्यंत हा उपक्रम सुरू हाेता. त्यानंतर १ जुलै २०२० पासून समूह स्तरावर हा उपक्रम राबविण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणा विद्यार्थ्यांना शिकविले जाते. त्यानंतर अभ्यासक्रमावर लेखी व ताेंडी परीक्षा घेतली जाते.
याशिवाय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हाेमिओ साेसायटीचे डाॅ. मधुकर गुबळे, समन्वयक संजीवनी ठाकरे, संजीवनी भरडे, डाॅ. सतीश गाेगुलवार, संस्थेचे सचिव अकिल शेख, विलास मडावी व शिक्षक सहकार्य करीत आहेत.