जैवविविधतेचे संवर्धन होणे आवश्यक
By admin | Published: May 22, 2014 11:52 PM2014-05-22T23:52:06+5:302014-05-22T23:52:06+5:30
गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहेत. जल, जंगल, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. प्रेक्षणिय स्थळे आहेत. अशी विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात जैवविविधता आढळून येते.
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहेत. जल, जंगल, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. प्रेक्षणिय स्थळे आहेत. अशी विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात जैवविविधता आढळून येते. या जैवविविधतेचे आधुनिक काळातही संवर्धन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी केले. आंतरराष्टÑीय जैवविविधता दिनानिमित्त आज गुरूवारी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने ‘शाश्वत उपजिविकेसाठी जैवविविधता व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. स्तरावरील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जि.प. चे कृषी सभापती अतूल गण्यारपवार गडचिरोली वनविभागाच्या उपवनसंरक्षक तथा समितीच्या सचिव श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य तथा समाजसेवक देवाजी तोफा, वृक्षमीत्र संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. डोळस आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी रणजितकुमार म्हणाले. जैवविविधता ही परस्परावलबी आहे. जैवविविधता टिकविण्यासाठी योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, पंचायत समित व ग्रामपंचायत स्तरावर जैवविविधता व्यवस्थापनाची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. जैवविविधतेची माहिती पिढ्यान्पिढ्या संक्रमीत होत नाही. जिल्ह्यातील जैवविविधतेचा ºहास करू नका, असे आवाहनही जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी यावेळी केले. कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत संपूर्ण गावपातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याचे नियोजन आहे. बहुतांश गावांमध्ये या समित्या स्थापन झाल्या आहेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जैवविविधता टिकविता येते, असेही गण्यारपवार यावेळी म्हणाले. उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला यांनी वनविभागामार्फत उभारण्यात आलेल्या उद्यानातील वनोषधीची, विविध प्रकारचे वृक्ष, फळ यांचीही माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)