परीक्षा शुल्क परतीसाठी बँक खाते क्रमांक द्या
By admin | Published: May 28, 2016 01:33 AM2016-05-28T01:33:34+5:302016-05-28T01:33:34+5:30
टंचाईग्रस्त गावांमधील दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याकरिता बँक खातेनिहाय सुधारित प्रपत्रात माहिती सादर करावी,
नवीन निर्णय : शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना
गडचिरोली : टंचाईग्रस्त गावांमधील दहावी व बारावीमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याकरिता बँक खातेनिहाय सुधारित प्रपत्रात माहिती सादर करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
२० नोव्हेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील ३६८ गावे व २३ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार १ हजार ३९८ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याकरिता या कार्यालयाने प्रस्ताव मागितले होते. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी १८ मे २०१६ रोजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावरच रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. व सुधारित प्रपत्रात बँक खातेनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मुख्याध्यापकांना सुधारित प्रपत्र शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कार्यालयातून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त करून दिला आहे. एम. एस. एक्सलमध्ये तीन प्रतित हार्डकॉपी २ जूनपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात सादर कराव्यात. प्रतिपूर्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, अशा सूचना शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)