आसरअल्ली तालुक्याची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:57 AM2017-11-16T00:57:16+5:302017-11-16T00:58:34+5:30
तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्याच्या आसरअल्ली परिसरातील दुर्गम गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात आविसंच्या या शिष्टमंडळाने थेट सिरोंचाच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, संतोष भिमकरी, असरअल्ली तंमुसचे अध्यक्ष समय्या तोरकरी, रसुल शेख मेहबूब, विजय तुमडे, संजय चिंताकाणी, श्रीशैलम मोरला, लक्ष्मण सिडाम, समय्या गावडे, समय्या कोडापे, विजय भिमकरी, समय्या चौधरी, सुरेश पेटकरी, बिचमन्ना भडे, संतोष चेनुरी, शरद गुंडे, सुधाकर वायम, गणेश टेकाम, पुरूषोत्तम सुर्पा आदी उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आविसंने म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून असरअल्ली हे गाव २५० किमी अंतरावर आहे. सिरोंचा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेला पातागुडम हे गाव तालुक्यापासून ५५ किमी अंतरावर आहे. असरअल्ली महसूल मंडळ अंतर्गत १४ ग्रामपंचायती असून अनेक गावांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त डोंगराळ व जंगलव्याप्त हा भाग असल्याने सिरोंचा तालुक्याचे विभाजन करून आसरअल्ली या नव्या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.