१९२ बटालीयनतर्फे स्थापना दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:38 AM2021-07-28T04:38:08+5:302021-07-28T04:38:08+5:30
गडचिराेली : सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिराेली येथील कॅम्पमध्ये सीआरपीएफचे पाेलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) मानस रंजन यांच्या अध्यक्षतेखाली सीआरपीएफचा ९२वा ...
गडचिराेली : सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिराेली येथील कॅम्पमध्ये सीआरपीएफचे पाेलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) मानस रंजन यांच्या अध्यक्षतेखाली सीआरपीएफचा ९२वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम पाेलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन, १९२ बटालीयनचे कमांडंट जियाऊ सिंह यांनी शहीद स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, पाेलीस उपमहानिरीक्षक रंजन यांना सेरिमाेनियम गार्डच्या वतीने गार्ड ऑफ ऑनरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सीआरपीएफच्या गाैरव व वैभवशाली इतिहासाची माहिती दिली. त्यानंतर, परिसरात वृक्षाराेपण करण्यात आले व व्हाॅलीबाॅल खेळाचे आयाेजन करण्यात आले.
कार्यक्रमाला १९२ बटालीयनचे वरिष्ठ अधिकारी दीपककुमार साहू, द्वितीय कमान अधिकारी प्रभात गाैतम, सुमित कुमार, उपकमांडंट सपन सुमन, प्रवीण कुमार त्रिपाठी, संध्या राणी, चिकित्सा अधिकारी डाॅ.रविकिरण दिघाडे, सहायक कमांडंट सुनील कुमार उपस्थित हाेते.