जिल्हास्तरीय कोविड संसर्ग प्रतिबंध कृतीदलाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:37 AM2021-07-31T04:37:09+5:302021-07-31T04:37:09+5:30
सदर कृतीदलाचा कालावधी एक वर्षापर्यंत राहणार आहे, तसेच तालुका स्तरावरील कृतीदलाची स्थापना संबंधित तालुक्याचे तहसीलदार आपल्या स्तरावर करणार आहेत. ...
सदर कृतीदलाचा कालावधी एक वर्षापर्यंत राहणार आहे, तसेच तालुका स्तरावरील कृतीदलाची स्थापना संबंधित तालुक्याचे तहसीलदार आपल्या स्तरावर करणार आहेत. ग्रामीण पातळीवर कृतीदल स्थापन करण्याची जबाबदारी संबंधित संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
(बॉक्स)
जिल्हास्तरीय कृतीदलात यांचा समावेश
जिल्हास्तरीय कोविड संसर्ग प्रतिबंध कृतीदलात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली हे सहअध्यक्ष असतील. निवासी उपजिल्हाधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प., जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लेखा व वित्त अधिकारी जि.प.गडचिरोली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत, आयसीडीएस, पाणी व स्वच्छता), जिल्हा पुरवठा अधिकारी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा समन्वयक माविम, अध्यक्ष स्पर्श स्वयंसेवी संस्था गडचिरोली, आयुष वैद्यकीय प्रतिनिधी, समन्वयक युवा केंद्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा अध्यक्ष आयएमए हे या समितीचे सदस्य असतील.
(बॉक्स)
एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू
- जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनी शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय नवीन ८ रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ५७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. मृत ७० वर्षीय पुरुष मुलचेरा तालुक्यातील रहिवासी आहे.
- आतापर्यंत जिल्ह्यात ७४४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नवीन ८ बाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील २ आणि सिरोंचा तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या १० रुग्णांमध्ये चामोर्शी तालुक्यातील ५ व धानोरा तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.