विद्यापीठात कार्यकारिणी गठित
By Admin | Published: November 1, 2014 10:53 PM2014-11-01T22:53:36+5:302014-11-01T22:53:36+5:30
गोंडवाना विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारी मंडळ व कार्यक्रम सल्लागार मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारी मंडळ व कार्यक्रम सल्लागार मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यकारिणीचे गठण राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सी. डी. मायी, सदस्य म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, ग्रामीण क्षेत्र तंत्रज्ञान विकल्प केंद्राचे प्रमुख, बीसीयुडीचे संचालक, जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी चंद्रपूर, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालकीय व्यवस्थापक डॉ. विवेक सावंत, मोहन हिराबाई हिरालाल, भारतीय कृषी औद्योगिक संस्थांचे अध्यक्ष गिरीष सोहनी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, एसटीआरसीचे सचिव आदी सदस्यांचा समावेश आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या कार्यक्रम सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, एसपीआरसीचे समन्वयक, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रतिनिधी गोंडवाना विद्यापीठाच्या बीसीयुडीचे संचालक, मुख्य वनसंरक्षक एस.के. रेड्डी, आयआयटीबी मुंबईचे प्रा. मिलिंद सोहनी, धातुकर्म व पदार्थ अभियांत्रिकी विभागाचे डॉ. दिलीप पेशवे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रा. डी. एस. रघुवंशी, पीडीकेव्ही गडचिरोली कृषी महाविद्यालयाचे पी. आर. कडू, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था वर्धाच्या प्रगती गोखले, लवादा संपूर्ण बांबू केंद्राचे सुनिल देशपांडे, रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूरचे संचालक डॉ. ए. के. जोशी आदींचा सदस्य म्हणून सहभाग आहे.
संसाधन केंद्राचे पालकत्व भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई स्वीकारणार असून वनविभाग गडचिरोली हे या केंद्राला सहकार्य करणार आहेत. त्याबरोबरच विविध राष्ट्रीय संस्था केंद्राच्या उभारणीकरिता सहकार्य करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासकीय सुत्राकडून देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)