समितीतर्फे जांभळीचे मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:37 PM2018-03-25T22:37:00+5:302018-03-25T22:37:00+5:30
केंद्रीय समितीने २५ मार्च रोजी तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या मार्फत २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यांकन केले. तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
आॅनलाईन लोकमत
धानोरा : केंद्रीय समितीने २५ मार्च रोजी तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या मार्फत २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यांकन केले. तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
मूल्यांकन समितीने गावातील शौचालयांची पाहणी केली. घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, नागरिकांनी तयार केलेले शोषखड्डे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, कंपोस्ट खत निर्मितीच्या खड्ड्यांची पाहणी केली. त्याचबरोबर शाळा, अंगणवाडी, गावाच्या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. ग्रामसभेचे नियोजन, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन, गृह कराची वसुली, पाच टक्के पेसा अबंध निधी, ग्राम निधी, पाणी पुरवठा योजना तसेच लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. समितीमध्ये ग्राम विकास ट्रस्ट कल्याणचे प्रमुख प्रविण आवळे व निलेशकुमार या दोघांचा समावेश होता. यावेळी विस्तार अधिकारी जुआरे, सरपंच रत्नमाला टिकाराम बावणे, उपसरपंच वसंत लोहट, सदस्य नाजुकराव मडावी, लालाजी राऊत, पंढरी अवतरे, वामन लोहंबरे, लोमेश चांभाटे, टिकाराम बावणे यांच्यासह ग्राम विकास अधिकारी के. के. कुलसंगे उपस्थित होते.