अडीच वर्षे उलटूनही विकासाचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:44 PM2018-01-08T20:44:20+5:302018-01-08T20:44:40+5:30

‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली.

Even after two and a half years, there is no developmental address | अडीच वर्षे उलटूनही विकासाचा पत्ता नाही

अडीच वर्षे उलटूनही विकासाचा पत्ता नाही

Next
ठळक मुद्देसूरजागडात कार्यकर्ता मेळावा : धर्मरावबाबा आत्राम यांची सरकारवर जोरदार टीका

आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : ‘अच्छे दिन आयेंगे’ असे स्वप्न गडचिरोली जिल्ह्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेला दाखवून भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. भाजप सरकारच्या कार्यकाळाला आता अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र या अडीच वर्षात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात विकासाची ठोस कामे झाल्याचे दिसून येत नाही. जी कामे सुरू आहेत. ती जुन्या सरकारच्या कार्यकाळातील आहेत. विद्यमान सरकारच्या काळात आदिवासी बहुल भागात विकासाचा पत्ता नाही, अशी टीका माजी राज्यमंत्री तथा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.
राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील सूरजागड यात्रेनिमित्त सूरजागड येथे रविवारी कार्यकर्ता मेळावा तथा आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती बेबी लेकामी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, प्रभाकर बारापात्रे, फक्रुद्दीन अहमद, माजी सभापती मंगू मट्टामी, जि. प. सदस्य ज्ञानकुमार कौशी, ऋषी पोरतेट आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी बांधवांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच सूरजागडातील ठाकूर देवाचे विधीवत पूजन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. किशोर बुरबुरे यांनी मानले.

Web Title: Even after two and a half years, there is no developmental address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.