काेराेनाच्या संकटातही गणेशाेत्सव जाेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:26+5:302021-09-10T04:44:26+5:30
गणेशाेत्सवाच्या दिवशी गडचिराेली शहरातील विविध भागांत मूर्ती विकल्या जात हाेत्या. या मूर्ती नेतेवेळी वाहतूककाेंडीची समस्या निर्माण हाेत हाेती. मुख्य ...
गणेशाेत्सवाच्या दिवशी गडचिराेली शहरातील विविध भागांत मूर्ती विकल्या जात हाेत्या. या मूर्ती नेतेवेळी वाहतूककाेंडीची समस्या निर्माण हाेत हाेती. मुख्य रस्त्यावरच मूर्ती विकल्या जात असल्याने अपघातांची शक्यताही बळावली हाेती. या सर्व समस्यांपासून सुटका करण्याबराेबरच पीओपीच्या मूर्ती विक्रीला आळा बसावा यासाठी या वर्षी गडचिराेली शहरातील मूर्तिकारांच्या संघटनेने गणेशाच्या मूर्ती एकाच ठिकाणी विकण्याचा निर्णय घेतला. धानाेरा मार्गावरील सुरेश पाेरेड्डीवार यांच्या घरासमाेर स्वतंत्र मंडप तयार करण्यात आला आहे. गुरुवारी या ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या हाेत्या. गुरुवारी भाविकांनी बऱ्यापैकी मूर्ती खरेदी केल्या.
गणेशाेत्सवाच्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यातून काही विक्रेते गणेशमूर्ती विक्रीसाठी आणतात. ते मुख्य चाैकातच रस्त्याच्या बाजूला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना मंडपातच मूर्ती विक्रीची सक्ती करण्याची गरज आहे. अन्यथा मंडपात बसणाऱ्यांचे माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया काही विक्रेत्यांनी ‘लाेकमत’कडे व्यक्त केली.