आठव्या दिवशीही विद्यापीठ कर्मचारी आंदोलनाची धग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:45+5:30
उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशी विनंती कृती समितीला केली होती. मागील वर्षीप्रमाणे यावेळी मंत्रांच्या व अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला बळी न पडता सतीश पडोळे यांनी दिला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आठ दिवसांपासून राज्यभरातील अकृषी विद्यापीठांचे व अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी अनिश्चितकालीन संपावर उतरलेले आहेत. या संपाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम दिसू लागला आहे. मागील आठ दिवसांपासून गोंडवाना विद्यापीठाचा महाविद्यालयांशी पूर्णतः संपर्क तुटलेला आहे.
दुसरीकडे आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाची दखल अद्यापही घेतली गेली नसल्याने पुनश्च किती काळ कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागेल, असा प्रश्नचिन्ह सर्वत्र उपस्थित केल्या जात आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशी विनंती कृती समितीला केली होती. मागील वर्षीप्रमाणे यावेळी मंत्रांच्या व अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला बळी न पडता सतीश पडोळे यांनी दिला. आंदोलनाचे सातत्य कायम राखण्यासाठी आंदोलन सुटीच्या दिवशीसुद्धा सुरू असावे या उद्देशाने २५ व २६ या सुटीच्या दिवशीही कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.
परीक्षा लांबण्याची शक्यता
येत्या १० जानेवारीपासून गोंडवाना विद्यापीठाच्या शीतकालीन परीक्षा होऊ घातल्या आहेत. वेळापत्रकही प्रसिद्ध झालेले आहेत. परंतु कर्मचारी संपावर असल्यामुळे परीक्षेच्या पूर्वतयारीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परीक्षा लांबणीवर पडणार की काय असा सवालही विद्यार्थी व पालकांमध्ये पडत आहे.