माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:23+5:302021-07-18T04:26:23+5:30
काेट नवविवाहित मुलीच्या आई म्हणतात... माझी मुलगी लग्न हाेऊन दीड वर्षापूर्वी सासरी गेली आहे. तिची सारखी आठवण येते. काेराेना ...
काेट
नवविवाहित मुलीच्या आई म्हणतात...
माझी मुलगी लग्न हाेऊन दीड वर्षापूर्वी सासरी गेली आहे. तिची सारखी आठवण येते. काेराेना संकट व शेतीच्या कामामुळे ती माहेरी जास्त येऊ शकत नाही. अनेक कार्यक्रमही करता आले नाहीत. आता आषाढ महिन्यात मुलीला बाेलविले आहे.
-सारिका पंधरे
काेराेनाचा संसर्ग कमी झाला तरी मनामध्ये भीती कायम आहे. मुलीला माहेरी आणावे, असे वाटते. मात्र, तिच्या सासरच्या मंडळीकडून माहेरी जाण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आम्ही मुलीला आणू शकलाे नाही. दीड ते दाेन महिन्यांनंतर तिला आणण्याचा विचार आहे.
-कल्पना चाैधरी
नवविवाहिता म्हणते...
दीड वर्षापूर्वी माझे लग्न झाले. काेराेनामुळे माहेरी जाता आले नाही. आता काेराेनाचा संसर्ग कमी झाला असून, निर्बंध शिथिल झाले आहेत. श्रावण महिन्यात माहेरी जाण्याचे नियाेजन आहे.
-नीता केरामी
गेल्या अनेक दिवसांपासून माहेरची ओढ लागली आहे. काेराेना संसर्गामुळे माहेरी जाता आले नाही. आठवण आली की, फाेनवरच संभाषण करून मनाला समाधानी केले जात आहे.
-प्रिया मुंडले