राेजी गेली तरी अडीच लाख कुटुंबांना मिळणार राेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:28+5:302021-04-16T04:37:28+5:30

काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील अनेक नागरिकांचा राेजगार ...

Even if Raji leaves, 2.5 lakh families will get Raiti | राेजी गेली तरी अडीच लाख कुटुंबांना मिळणार राेटी

राेजी गेली तरी अडीच लाख कुटुंबांना मिळणार राेटी

Next

काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील अनेक नागरिकांचा राेजगार गेला आहे. १५ दिवस घरी बसून राहण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. हा वर्ग हातावर आणून पानावर खाणारा असल्याने मजुरी बुडाल्यानंतर उपासमारीचे संकट या वर्गावर येणार हाेते. यातून या वर्गाला थाेडा दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने एक महिन्याचे धान्य माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभरात एकूण २ लाख २६ हजार ५८८ कार्डधारक आहेत. त्यापैकी बीपीएल, अंत्याेदय, अन्न सुरक्षा प्राधान्य कुटुंबाचे १ लाख ९१ हजार १३ कार्ड आहेत. या सर्वांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जाते. तर २८ हजार ८७८ एपीएल कुटुंब आहेत. तर ६ हजार ६९७ कुटुंबांकडे शुभ्र कार्ड आहे. या कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जात नाही. मात्र संचारबंदीसंदर्भात काढलेल्या निर्णयामध्ये रेशनकार्ड नसला तरी मागणी करेल त्या कुटुंबाला माेफत धान्य दिले जाणार आहे. म्हणजेच जवळपास अडीच लाख कुटुंबांना माेफत धान्य याेजनेचा लाभ मिळणार आहे.

बाॅक्स......

गहू व तांदळाचाच पुरवठा करावा

मागील काही महिन्यांमध्ये गडचिराेली जिल्ह्यात गहू व तांदळासाेबतच मक्याचा पुरवठा करण्यात आला हाेता. मात्र मक्याला अनेक नागरिकांची नापसंती दिसून आली. अनेकांनी मका जनावरांना खाऊ घातला तर काहींनी मक्याच्या बदल्यात पाेहे, मुरमुरे खरेदी केले. संचारबंदीमुळे नागरिकांना घरी राहावे लागणार आहे. त्यामुळे गहू व तांदळाचाच पुरवठा करण्याची मागणी आहे.

काेट ........

शासनाने निर्णय घेतला नसता तरी नागरिकांना नियमित तांदूळ व गहू मिळणारच हाेते. मजुरी बुडाल्याने हजाराे रूपयांचा ताेटा झाला आहे. शासन मात्र महिन्याचे केवळ पाच किलाे गहू देऊन गरिबांची थट्टा करीत आहे. मजुरी बुडालेल्या व्यक्तीला ठाेस मदत करण्याची गरज हाेती. - राजेंद्र थाेरात, नागरिक

काेट ...

संचारबंदी आणखी किती दिवस चालणार हे अजून स्पष्ट नाही. शासनाने केवळ एक महिन्याचे धान्य माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. माेफत धान्याऐवजी नागरिक व मजुरांना थेट मदत करण्याची गरज आहे. - राजू ठाकरे, नागरिक

जिल्ह्यातील कार्डधारकांची संख्या - २,२६,५८८

तालुकानिहाय कार्ड

गडचिराेली २८,३८३

धानाेरा १६,४९७

चामाेर्शी ४१,०३७

मुलचेरा १०,७३६

देसाईगंज २०,४७९

कुरखेडा १९,९७०

काेरची १०,१०५

आरमाेरी ६,१७१

अहेरी २९,३२९

एटापल्ली १४,७९९

सिराेंचा २१,१९२

भामरागड ७,५९६

एकूण २,२६,५८८

Web Title: Even if Raji leaves, 2.5 lakh families will get Raiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.