शेजाऱ्याला वीज दिली तरी दाखल हाेऊ शकताे चाेरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:41 AM2021-09-05T04:41:18+5:302021-09-05T04:41:18+5:30
घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते. कृषिपंपाची वीज ...
घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते. कृषिपंपाची वीज जर घरगुती कामासाठीसुद्धा वापरली असेल तरी वीजचाेरीचा गुन्हा दाखल हाेऊ शकते, अशी माहिती महावितरणकडून दिली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करूनही वीज गळती आणि चोरी सुरूच आहे. या चोरट्या विजेचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर भुर्दंड टाकला जात आहे. म्हणूनच महावितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम राबविली आहे.
बाॅक्स
कायदा काय सांगतो?
-शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार कारवाई केली जाऊ शकते.
- मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायरमध्येच खंडित करून थेट वीजपुरवठा केला असल्यास हा गंभीर गुन्हा माणून कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. कलम १३५ नुसार कारवाई झाली असल्यास व त्याने एक दिवसही चाेरी केली असल्यास त्याला दंड म्हणून किमान एक वर्षाच्या वीज बिलाच्या दुप्पट रक्क्म आकारली जाते. ताे किती वर्षांपासून चाेरी करीत आहे हे सिद्ध झाल्यास तेवढा दंड आकारला जाते.
बाॅक्स
चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा
- २००३ मध्ये तयार केलेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याकरिता 'वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा', ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.
-याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे, तर संबंधितास वीजचोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
काेट
नागरिकांनी वीज चाेरी न करता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा. वीज चाेरीच्या गुन्ह्यात संबंधिताला शिक्षाही हाेऊ शकते. वीजचाेरी पकडण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र पथक आहे. एखादा व्यक्ती वीज चाेरी करीत असल्यास त्याची माहिती महावितरणला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गाेपनीय ठेवले जाईल.
- रवींद्र गाडगे, अधीक्षक अभियंता, महावितरण, गडचिराेली
बाॅक्स
वर्षभरातील जवळपास कारवाया-१५०