कलेची जाेपासना करणाऱ्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अंधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:40+5:302021-02-11T04:38:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क विसाेरा : आपल्यातील अंगभूत प्रतिभा व कलागुणांना परिश्रमाची जाेड देत, लाेकांना ज्ञान, माहिती, साेबतच मनाेरंजनाच्या माध्यमातून ...

The evening darkened the lives of those who worshiped art | कलेची जाेपासना करणाऱ्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अंधारली

कलेची जाेपासना करणाऱ्यांच्या आयुष्याची संध्याकाळ अंधारली

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

विसाेरा : आपल्यातील अंगभूत प्रतिभा व कलागुणांना परिश्रमाची जाेड देत, लाेकांना ज्ञान, माहिती, साेबतच मनाेरंजनाच्या माध्यमातून समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात पैशासाठी कुणासमाेर हात पसरण्याची पाळी येऊ नये म्हणून शासनाकडून मानधन दिले जाते. मात्र, हे मानधन अतिशय अल्प आहे, तसेच तेही वेळेवर मिळत नसल्याने, अनेक आर्थिक अडचणींचा सामना या कलावंतांना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी कलावंतांना जिल्हा परिषदेमार्फत मानधन दिले जात हाेते. जिल्हा परिषदेने मानधन थकविल्यास कलावंत पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून मानधन उपलब्ध करून द्यायला लावत हाेते. आता मात्र, संचालक कार्यालयाकडून मानधन दिले जात असल्याने कलावंतांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काेट....

ठराविक वयोमानपरत्वे शरीर साथ देणे सोडते, अशा वेळी आम्हा साहित्यिकांच्या शब्दांना मर्यादा येतात. त्यामुळे तत्पूर्वी आमच्याकडून आयुष्यभर शब्दातून केलेल्या जनसेवेला शासन मानधन देऊन आर्थिक मदत करते, परंतु सरकार मानधन देताना नियमितपणा ठेवत नाही. मानधन देण्यात सातत्य असावे.

- एकनाथ बुधाजी बुद्धे, कवी (साहित्यिक), विसोरा

काेट.....

दर महिन्याला मानधन मिळत नाही, हे नेहमीचेच होऊन बसले आहे. कधी-कधी तर तीन ते चार महिने मानधन लांबत असल्याने आर्थिक गणित बिघडते. याकडे शासनाने जातीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्हाला दर महिन्याला ठरावीक तारखेला मानधन मिळावे.

- राजीराम वझाडे, पेटीमास्तर, कलावंत, विसोरा

काेट....

आम्ही पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपर्यंत मानधनासाठी पाठपुरावा करतो, परंतु यापुढे थेट संचालक कार्यालयातून मानधन मिळणार, असे कळले. हा निर्णय ग्रामीण कलावंतांना भविष्यात अडचणीचा ठरू शकतो. कारण मानधनाबाबत काही समस्या उद्भवल्यास संपर्क करणे कठीण होईल.

- श्यामराव तलमले, कलावंत, शंकरपूर

काेट....

आधी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत कलावंत-साहित्यिक यांना मानधन वितरित केले जात होते. मात्र, आता हा विषय राज्यस्तरीय असल्यामुळे मी अधिक बोलू शकत नाही.

- सुरेश पेंदाम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, गडचिरोली

बाॅक्स....

मानधन मिळणारे कलावंत साहित्यिक

राष्ट्रीय स्तरावरील - ०००

राज्य स्तरावरील - ०००

जिल्हा स्तरावरील - ३४२

Web Title: The evening darkened the lives of those who worshiped art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.