काेराेना संकटकाळात लाेकप्रतिनिधींनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:32 AM2021-04-05T04:32:53+5:302021-04-05T04:32:53+5:30

गडचिराेली शहरातील बहुतांश वाॅर्डांत काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत. ज्या ठिकाणी १० ते १२ रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र ...

In the event of a crisis, the Lak representatives should cooperate | काेराेना संकटकाळात लाेकप्रतिनिधींनी सहकार्य करावे

काेराेना संकटकाळात लाेकप्रतिनिधींनी सहकार्य करावे

Next

गडचिराेली शहरातील बहुतांश वाॅर्डांत काेराेनाचे रुग्ण आढळत आहेत. ज्या ठिकाणी १० ते १२ रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र घाेषित करण्यात येत आहे. शिवाय सभाेवतालचा परिसर बफर झाेन असणार आहे. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वाॅर्डातील प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन लाेकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करणे, घरच्या कुटुंबातील सदस्य व शेजाऱ्यांची काेराेना तपासणी करून घेणे, तसेच ४५ वर्षांवरील लाेकांना काेराेनाची लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे याबाबतची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाने पाळावी, असे जिल्हाधिकारी सिंगला यावेळी म्हणाले.

जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिराेली शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, शहरी प्राथमिक आराेग्य केंद्र गाेकुलनगर व पाेलीस रुग्णालय या चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत; पण लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी काेराेना लसीकरणाचा लाभ घ्यावा. लाेकांच्या मनातील शंका व भीती दूर करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, या कार्यात सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले याेगदान द्यावे, असे आवाहन आशीर्वाद यांनी केले.

बैठकीला नगराध्यक्ष याेगिता पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहाेळ, उपाध्यक्ष तथा आराेग्य सभापती अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, नियाेजन सभापती प्रशांत खाेब्रागडे यांच्यासह नगरसेवक तसेच पालिकेच्या आराेग्य विभागाचे प्रमुख उपस्थित हाेते.

बाॅक्स .....

खबरदारी घ्या -डाॅ. रुडे

जिल्ह्यात अचानक काेराेना रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालयात बेड, रक्त पुरवठा व ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकताे. त्यामुळे प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. सतत ताेंडावर मास्क वापरणे, नियमित हात सॅनिटाइज करणे व सामाजिक अंतर पाळून आपण काेराेनाशी लढा देऊ शकताे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रुडे यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: In the event of a crisis, the Lak representatives should cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.