अखेर वन विभागाने हटविले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:23 PM2019-07-08T22:23:34+5:302019-07-08T22:23:47+5:30
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळले. सदर झाड ७ जुलैपर्यंत रस्त्यावरच पडून होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत. या वृत्ताची दखल घेत वन विभागाने दखल घेत सदर झाड ८ जुलै रोजी तोडून मार्ग मोकळा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळले. सदर झाड ७ जुलैपर्यंत रस्त्यावरच पडून होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत. या वृत्ताची दखल घेत वन विभागाने दखल घेत सदर झाड ८ जुलै रोजी तोडून मार्ग मोकळा केला आहे.
मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने कमलापूरपासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या चिंतलगुडम येथील रस्त्याच्या बाजुला असलेले जुने चिंचेचे झाड कोसळले. त्यामुळे कोडसेलगुडम, छल्लेवाडा, ताटीगुडम या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. मानव विकास मिशनची बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत होता.
याबाबतचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सकाळपासूनच वन विभागाने कर्मचारी पाठवून झाड तोडले. त्यामुळे मार्ग मोकळा झाला.