४५ वर्षांवरील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:32 AM2021-04-03T04:32:49+5:302021-04-03T04:32:49+5:30
अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली नजीकच्या प्रत्येक ४५ वर्षांवरील नागरिकांनी व सोबतच तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाची प्रतिबंधक लस घेतल्यास कोरोना नियंत्रणासाठी याचा ...
अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली नजीकच्या प्रत्येक ४५ वर्षांवरील नागरिकांनी व सोबतच तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाची प्रतिबंधक लस घेतल्यास कोरोना नियंत्रणासाठी याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांनी न घाबरता व कुठलेही गैरसमज न ठेवता बिनधास्त कोरोनाची प्रतिबंधक लस घेऊन कोरोनाला आळा बसविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने लस घेण्याचे आवाहन तहसीलदार ओतारी यांनी केले, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दी टाळावी, शक्यतोवर घराच्या बाहेर न निघता अत्यंत महत्त्वाचे काम असल्यासच घराच्या बाहेर पडावे. ताप, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी, तसेच जे नागरिक बाहेर गावावरून अहेरी तालुक्यात प्रवेश करत असतील अशा नागरिकांनी तशी माहिती ग्राम पंचायत किंवा नगर पंचायत यांना द्यावी व स्वतः रॅपिड टेस्टही करून घ्यावी, असेही आवाहन यावेळी तहसीलदार ओतारी यांनी केले आहे. १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू झाले होते. दुसरा टप्पा फ्रंट लाइन वर्करसाठी २२ जानेवारीपासून तर १ मार्चपासून ६० वर्षावरील व ज्यांना बी.पी., शुगर अशा रोगाची लक्षणे आहेत, अशांना ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मोहीम सुरू झाली होती. चौथा टप्पा ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींसाठी १ एप्रिलपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहितीसुद्धा तहसीलदार ओतारी यांनी दिली.