७२ तासांच्या अटीमुळे अनेक पीक नुकसानीचे प्रस्ताव बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:02+5:302021-09-14T04:43:02+5:30

बाॅक्स ..... धान पिकाला नुकसान मिळणे कठीणच वैयक्तिक स्वरूपाचे नुकसान धानाच्या बाबतीत ग्राह्य धरले जात नाही. गावातील एखाद्या शेतकऱ्याच्या ...

Eviction of many crop damage proposals due to 72 hours condition | ७२ तासांच्या अटीमुळे अनेक पीक नुकसानीचे प्रस्ताव बेदखल

७२ तासांच्या अटीमुळे अनेक पीक नुकसानीचे प्रस्ताव बेदखल

Next

बाॅक्स .....

धान पिकाला नुकसान मिळणे कठीणच

वैयक्तिक स्वरूपाचे नुकसान धानाच्या बाबतीत ग्राह्य धरले जात नाही. गावातील एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरून त्याचे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असले तरी ताे नुकसान भरपाईस पात्र ठरत नाही. त्या क्षेत्रातील धान पिकाचे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान हाेणे अपेक्षित आहे. तेव्हाच लाभ मिळतो. कापूस, साेयाबीन यासारख्या पिकांना मात्र फक्त एकाच शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी त्याला लाभ दिला जाते. धानाच्या बाबतीत विमा कंपनीच्या जाचक अटी असल्याने सहजासहजी विम्याचा लाभ मिळत नाही.

बाॅक्स ....

नुकसानीच्या तक्रारीसाठी सहा पर्याय

१ नुकसानग्रस्त शेतकरी कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात.

२ ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडेही तक्रार दाखल करतात येते.

३ टाेल फ्री क्रमांक १८००१०३५४९० वर तक्रार नाेंदविता येते.

४ प्रधानमंत्री पीक विमा याेजनेच्या साइटवर तक्रार नाेंदविता येते.

५ प्रधानमंत्री पीक विमा याेजनेचे ॲप तयार केले आहे या ॲपवरही तक्रारीची सुविधा आहे.

६ केंद्र शासनाच्या क्राॅप इन्शुरन्स ॲपवरही तक्रार नाेंदविता येते.

बाॅक्स...

ऑनलाइनवरच भर

ऑनलाइन पद्धतीने तक्रार नाेंदविण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे ऑनलाइन तक्रारीला फारसे महत्त्व नाही. शेतकऱ्यांनी याबाबत सजग राहून आपल्या शेतीचे नुकसान झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार करावी.

बाॅक्स ......

३२ शेतकऱ्यांची यावर्षी तक्रार

यावर्षीच्या पावसाळ्यात सिराेंचा तालुक्यातील ३१ व मुलचेरा तालुक्यातील १ अशा एकूण ३२ शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतची तक्रार कंपनीकडे दाखल केली आहे. पावसाळा सुरूच आहे. त्यामुळे आणखी तक्रारी दाखल हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: Eviction of many crop damage proposals due to 72 hours condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.