ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:31 AM2018-12-22T01:31:50+5:302018-12-22T01:32:40+5:30

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने गुरूवारी देसाईगंज तहसील कार्यालयामार्फत कर्मचारी व नागरिकांसाठी जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

EVM VVPat Machine Training | ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण

ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलमध्ये कार्यक्रम : हातळणीबाबत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने गुरूवारी देसाईगंज तहसील कार्यालयामार्फत कर्मचारी व नागरिकांसाठी जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रशिक्षण प्रसंगी तहसीलदार सोनवणे, नायब तहसिलदार नैताम, नायब तहसीलदार गुठ्ठे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. फिरते वाहन पथकाद्वारे २४ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत तालुक्यातील सर्व गावात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दिले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार सोनवणे यांनी दिली.
व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार आहे. मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडले आहे, याची खात्री मतदार करू शकतो.

Web Title: EVM VVPat Machine Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.