दहावी-बारावीच्या २९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:24 AM2019-02-13T01:24:48+5:302019-02-13T01:25:23+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थी बसणार आहेत.

Exam for examinations of 29,000 students in Class XII | दहावी-बारावीच्या २९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध

दहावी-बारावीच्या २९ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध

googlenewsNext
ठळक मुद्दे२१ पासून सुरुवात : बारावीसाठी ४८ तर दहावीसाठी ७४ केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थी बसणार आहेत. सदर परीक्षा निकोप आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली आहे.
जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सदर परीक्षांबाबतचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा बारावीचे १३ हजार ९६० तर इयत्ता दहावीचे १५ हजार ९७४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने बारावीच्या परीक्षेसाठी ४८ तर दहावीच्या परीक्षेसाठी ७४ केंद्र ठेवण्यात आले आहेत.
बोर्डाची दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ६ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक पार पडली. त्यानंतर ११ फेब्रुवारीला गटशिक्षणाधिकारी व परिरक्षकांची बैठक गडचिरोली येथे पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली यंदा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. महसूल व शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यात येणार आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी शिक्षण विभागाला सहकार्य करावे, असे लेखी आदेश जिल्हाधिकाºयांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

चार नवीन केंद्र, एक केंद्र बदलले
जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी दोन नवीन परीक्षा केंद्रांना मंजुरी दिली आहे. तसेच एक केंद्र बदलविण्यात आले आहे. नव्या केंद्रांमध्ये विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा व प.पु. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट यांचा समावेश आहे. यापूर्वी गिलगाव बा. येथील साईबाबा विद्यालयात इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र राहात होते. मात्र हे केंद्र रद्द करण्यात आले असून या केंद्राऐवजी अमिर्झा येथील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हे केंद्र राहणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा दोन नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये भगवंतराव आश्रमशाळा राजाराम खांदला व भगवंतराव हायस्कूल गोमणी यांचा समावेश आहे.

सहा भरारी पथकांची नजर
इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक जिल्हाभरातील सर्व केंद्रांवर टप्प्याटप्याने धाडी टाकणार आहेत. या भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषयासाठी व प्रत्येक केंद्रांवर पेपरच्या कालावधीमध्ये पूर्ण तीन तास बैठे पथकही कार्यरत राहणार आहे.

Web Title: Exam for examinations of 29,000 students in Class XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा