‘भारत भ्रमण’साठी ३०२ विद्यार्थ्यांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:58 PM2018-09-30T23:58:14+5:302018-09-30T23:59:10+5:30

आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘भारत भ्रमण’ सहलीसाठी निवड करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली.

Examination of 302 students for 'India Tour' | ‘भारत भ्रमण’साठी ३०२ विद्यार्थ्यांची परीक्षा

‘भारत भ्रमण’साठी ३०२ विद्यार्थ्यांची परीक्षा

Next
ठळक मुद्दे४४ विद्यार्थ्यांची होणार निवड : आदिवासी विकास विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘भारत भ्रमण’ सहलीसाठी निवड करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. ३०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांमधून ४४ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत वर्ग सहा ते नऊमध्ये शिकत असलेल्या वर्गातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या मुलामुलींची निवड परीक्षा घेण्यात आली. यावर्षी हे विद्यार्थी सातवी ते दहावी या वर्गात शिकत आहेत. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत झाली. यात १९० पैकी १६३ विद्यार्थी परीक्षेला बसेल. अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांची गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रमशाळेत परीक्षा झाली. यामध्ये ८८ पैकी ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले. भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा तोडसा व ताडगाव येथील आश्रमशाळेत झाली. तोडसा येथे ४० पैकी ३७ तर ताडगाव येथे २४ पैकी २३ विद्यार्थी परीक्षेला बसले. अशा एकूण ३४२ पैकी ३०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
तिन्ही प्रकल्पातून २२ मुले व २२ मुली अशा एकूण ४४ विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. परीक्षेत सर्वाधिक गुण घेणाºया विद्यार्थ्यांची प्रकल्पनिहाय निवड होणार आहे. निवड झालेले विद्यार्थी भारतातील शैक्षणिक, ऐतिहासिक, मनोरंजनात्मक स्थळे, औद्योगिक शहरांना भेटी देणार आहेत. राष्टÑपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांचीही भेट घेणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रथमच विमानवारी करायला मिळणार आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रथमच भारत भ्रमण सहल केली जाणार आहे. योजनेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सहकार्य केले.
सहायक प्रकल्प अधिकारी आर. के. लाडे यांनी गडचिरोली येथील परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून काम पाहिले.

Web Title: Examination of 302 students for 'India Tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा