जास्तीचे पाणीदेखील आराेग्याला अपायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:51+5:302021-09-22T04:40:51+5:30
गडचिराेली : आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान हाेते तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आराेग्याला धाेकादायक ठरू शकते. यामुळे ...
गडचिराेली : आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान हाेते तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आराेग्याला धाेकादायक ठरू शकते. यामुळे शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाण्याचे सेवन करावे, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
एकवेळचे जेवण मिळाले नाही तरी माणूस जिवंत राहू शकतो. मात्र, पाण्यावाचून जिवंत राहणे कठीण आहे. त्यामुळे शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे पाणी प्रत्येक नागरिकाने पिणे आवश्यक आहे. मात्र, काेणत्याही गाेष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम भाेगावे लागतात. हीच बाब पाणी पिण्याबाबतही लागू हाेते. पाणी कमी प्यायल्यास शरीराचे काेणते नुकसान हाेते, याविषयी बऱ्याचशा नागरिकांना माहिती आहे. मात्र, जास्त पाणी प्यायल्यासही शरीराचे माेठे नुकसान हाेते.
बाॅक्स...
वातावरणानुसार बदलते पाण्याच्या गरजेचे प्रमाण
आपण काेणत्या परिस्थिती राहताे, काम करताे, यावर शरीराला पाण्याची गरज अवलंबून असते. एखादा कामगार उष्णतेच्या ठिकाणी काम करीत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे त्याला जास्त पाणी प्यावे लागते. तसेच हगवण, उलट्या हाेत असल्यास अधिकचे पाणी प्यावे लागते. त्यातुलनेत एसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमी प्रमाणात पाणी प्यावे लागते.
बाॅक्स....
कमी पाणी प्यायले तर....
शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्याल्यास डाेके दुखणे, चक्कर येणे, झाेपे येणे, लघवी कमी हाेणे, लघवी पिवळी येणे, ओठ व त्वचा काेरडी पडणे, बीपी कमी हाेणे, बद्धकाेष्ठता हाेणे आदी लक्षणे दिसून येतात. पाणी कमी प्यायल्यामुळे शरीराचे माेठे नुकसान हाेते.
बाॅक्स...
जास्त पाणी प्यायले तर...
मळमळ हाेणे, उलटी हाेणे, डाेके दुखणे, भ्रमिष्ठपणा वाटणे, कमजाेरी वाटणे, बेशुद्ध पडणे आदी लक्षणे दिसून येतात. जास्त पाणी पिणेही आराेग्यासाठी धाेकादायक आहे.
काेट....
शरीराची गरज, काम करण्याचे ठिकाण, वातावरण यावरून प्रत्येक व्यक्तिला पाण्याची वेगवेगळ्या प्रमाणात गरज भासते. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीने दिवसातून तीन लीटर पाणी प्यावे. पुरूषांच्या तुलनेत महिलांना कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. सर्वसाधारण महिलेला २.२ लीटर, गराेदर मातेला २.५ लीटर व स्तनदा मातेला ३ लीटर पाण्याची गरज भासते. पाण्याचे जास्त प्राशन केल्यामुळे शरीरातील साेडियमचे प्रमाण कमी हाेण्याचा धाेका राहतो.
- डाॅ. प्रशांत कारेकर, फिजिशियन, गडचिराेली
बाॅक्स...
काेणी किती पाणी प्यावे
वयाेगट दिवसाला किती पाणी (लीटर)
० ते ६ महिने आवश्यकता नाही
६ महिने ते १ वर्ष २५० मिलिलीटर
१ ते ३ वर्षे १ लीटर
४ ते ८ वर्षे १.२ लीटर
९ ते १३ वर्षे १.८ लीटर
१४ ते १८ वर्षे २.५ लीटर
१८ वर्षांवरील ३ लीटर