आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:51 PM2017-09-25T23:51:13+5:302017-09-25T23:51:33+5:30

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संप फोडण्यासाठी शासनाने अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांना देण्याचा निर्णय बुधवारी घेतला.

Exhibitions of Asha GroupProviders | आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

Next
ठळक मुद्देजि.प.समोर जीआरची होळी : अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपास पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संप फोडण्यासाठी शासनाने अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांना देण्याचा निर्णय बुधवारी घेतला. मात्र आशा व गटप्रवर्तक संघटनांनीही अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा देत त्यांची कामे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याचा निषेध म्हणून आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद समोर शासनाच्या जीआरची होळी करून निदर्शने करण्यात आली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, माजी जि.प. सदस्य अमोल मारकवार, संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, कविता दरवडे, संगीता मेश्राम, विद्यादेवी येजुलवार, मंगला उडाण, मुन्नी चापले, लता नंदेश्वर आदीसह शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तक महिला उपस्थित होत्या.
अंगणवाडीचे काम आशा कर्मचारी करणार नाही, असा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला असून शासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा यावेळी निषेध करण्यात आला. संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी आरोग्य खात्याअंतर्गत येतात व सर्व कामे तुटपुंज्या मोबदल्यात करतात. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे आजपर्यंत प्रचंड दुर्लक्ष करून मानधन लागू केले नाही. शिवाय मागील एप्रिल महिन्यापासूनचा कामाचा मोबदला प्रलंबित आहे. यामुळे आशा वर्कर व गट प्रवर्तक महिला प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. याप्रसंगी विनोद झोडगे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांनी सरकारच्या विरोधात ताशेरे ओढले.
या आहेत निवेदनातील आशा वर्कर्सच्या मागण्या
आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, या कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायम करावे, आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर त्यांच्या नेमणुका कराव्या, राष्टÑीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी राबविण्याचे जाहीर करावे, केंद्र सरकारने ईपीएफ, आरोग्य विमा व प्रती दिन ३५० रूपये मानधन देण्याच्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात व ताललुक्यातील रूग्णालयात स्वतंत्र खोलीची व्यवस्था करावी आदीसह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Web Title: Exhibitions of Asha GroupProviders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.