अपेक्षित पावसाच्या केवळ ६.६ टक्के पाऊस पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:36 PM2019-06-11T22:36:41+5:302019-06-11T22:37:01+5:30

११ जूनपर्यंत ७४.५ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यावर्षी केवळ ४.९ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी केवळ ६.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. मागील वर्षी ११ जूनपर्यंत ७५.७ मिमी पाऊस पडला होता, हे विशेष.

The expected rainfall was only 6.6 percent | अपेक्षित पावसाच्या केवळ ६.६ टक्के पाऊस पडला

अपेक्षित पावसाच्या केवळ ६.६ टक्के पाऊस पडला

Next
ठळक मुद्देअत्यंत कमी पाऊस : मागील वर्षी ११ जूनपर्यंत ७५.७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ११ जूनपर्यंत ७४.५ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यावर्षी केवळ ४.९ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी केवळ ६.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. मागील वर्षी ११ जूनपर्यंत ७५.७ मिमी पाऊस पडला होता, हे विशेष.
खरीपपूर्व मशागतीच्या कामे आटोपली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी आता शेतकरी केवळ पावसाची प्रतिक्षा करीत आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उकाड्याने शहरवासीय सुध्दा त्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्राला सुरूवात झाल्याबरोबर पाऊस जरी झाला नाही, तरी तापमान कमी होते. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी मृग नक्षत्र सुरू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटून सुध्दा उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पड आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ११ जूनपर्यंत जिल्हाभरात ७४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र केवळ ४.९ मिमी एवढाच पाऊस यावर्षी पडला आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये अजूनपर्यंत थेंबभर सुध्दा पाऊस पडला नाही. केवळ सिरोंचा, कुरखेडा, मुलचेरा, भामरागड या चार तालुक्यांमध्ये थोडाफार पाऊस झाला आहे. उर्वरित सात तालुके अजुनही कोरडे आहेत. पाऊस लांबल्यास पेरणीची कामे लांबण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पिकांवरही होतो.
 

Web Title: The expected rainfall was only 6.6 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस