ज्येष्ठांचा अनुभव कुटुंबास फायद्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:42 AM2018-02-25T00:42:03+5:302018-02-25T00:42:03+5:30
ज्येष्ठ नागरिक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या तारुण्यात आपला वेळ, आपली मेहनत दिली म्हणून आज आपण हे सर्व बघत आहोत.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : ज्येष्ठ नागरिक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या तारुण्यात आपला वेळ, आपली मेहनत दिली म्हणून आज आपण हे सर्व बघत आहोत. मात्र ही गोष्ट आपण जाणीपूर्व विसरतो. आजचे ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्याकडे जर लक्ष दिले व त्यांना एकत्र येण्याची जास्तीत जास्त संधी दिली तर येणारी पिढी ही चांगली राहील. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव हा लहान मुलांसाठी योग्य नागरिक घडविण्यासाठी व कुटुंबाला फायद्याचा राहिल, असे प्रतिपादन मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव बी.एम. पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय सेवा सदनात शनिवारी ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क’ याविषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी.एन. बर्लावार, सचिव डी.डी. सोनटक्के, पी.एल.व्ही. वर्षा मनवर, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू.एम. खान व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
३०० लोकांची मेघे हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. परंतु गडचिरोली येथे जेनेरिक मेडिसीन उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत औषधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. याप्रसंगी डी.डी. सोनटक्के यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपले गेलेले आयुष्य कसे होते, याचा विचार करण्यापेक्षा येणारे आयुष्य कसे चांगले जाईल, याचा विचार करावा व त्यासाठी संघर्ष करावा, असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ नागरिक गेडाम यांनी स्त्रिया आणि पुरूष या दोघांनाही घर सांभाळणे आवश्यक आहे. काही गोष्टी परिवारासाठी करताना काही नियम तोडले गेले व परिस्थिती सांभाळता आली तर माणसाने परिवार सांभाळताना ते सुद्धा करावे, असे परखड मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन पीएलव्ही वैशाली बांबोळे तर आभार बी.व्ही. वाळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.