खाद्यतेल व गॅसच्या भडक्याने नाश्त्याची चव महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:43+5:302021-09-04T04:43:43+5:30
गडचिराेली : दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या वस्तूंची दरवाढ झाली. तूर, मूग, उडीद डाळीचे भावही गगनाला भिडले आहेत. याशिवाय खाद्यतेल ...
गडचिराेली : दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या वस्तूंची दरवाढ झाली. तूर, मूग, उडीद डाळीचे भावही गगनाला भिडले आहेत. याशिवाय खाद्यतेल व गॅसचा भडका झाल्याने गडचिराेली शहरात नाश्त्याची चव आता महागली आहे. १० ते १५ रुपयांना मिळणारा नाश्ता आता सर्वत्र २० रुपये झाला आहे.
दाेन महिन्यांपूर्वी व्यावसायिक सिलिंडर १२०० ते १२५० रुपयांना मिळत हाेते. या सिलिंडरची किंमत आता १८५० ते १९०० रुपये झाली आहे. केंद्र सरकारने गेल्या दीड ते दाेन वर्षांपासून अत्यावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ केली. परिणामी सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक व कुटुंबांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. आता सकाळ किंवा दुपारच्या नाश्त्याला प्रति प्लेट २० रुपये माेजावे लागत आहेत.
बाॅक्स .....
माेठे हाॅटेल व भाेजनालयाच्या व्यवसायाला फटका
गडचिराेली शहरातील इंदिरा गांधी परिसर, बसस्थानक परिसर तसेच धानाेरा, आरमाेरी, मूल व चामाेर्शी या चारही मार्गांवर फूटपाथवर चहा, नाश्त्याचे ठेले लावले जातात. या ठेल्यांवर ग्राहकांच्या पसंतीला उतरणारा नाश्ता मिळत असल्याने अनेक लाेक आस्वाद घेतात. याचा परिणाम शहरातील माेठे हाॅटेल व भाेजनालयाच्या व्यवसायावर झाला आहे. भाेजनासाठी ज्यादा पैसे माेजावे लागत असल्याने पर्याय म्हणून महागाईच्या काळात अनेक लाेक नाश्त्यावर भागवून घेत आहेत. पूर्वी समाेसे, भजी व आलूपाेहाची या नाश्त्याची माेठी क्रेझ हाेती. मात्र, आता बरेच जण दहीवडा, अप्पे व नवीन प्रकारच्या नाश्त्याकडे वळले आहेत.
बाॅक्स ...
सर्वच पदार्थ महागले
केंद्र शासनाने खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंची वाढ केल्यामुळे खाद्यपदार्थ व नाश्त्याच्या भावात व्यावसायिकांना वाढ करावी लागली. आता भजी, समाेसे, कचाेरी, आलूभजी, मिरची भजी, मिसळ, ब्रेड पकाेडे, चनाचिवडा, सांभारवडा, दहीवडा, इडली, उपमा आदींसह सर्वच नाश्त्याचे पदार्थ महागले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून २० रुपये प्लेट झाले आहे.
काेट ...
खाद्यतेल व गॅस तसेच डाळीचे भाव वाढल्याने पूर्वीच्या भावात नाश्त्याचे पदार्थ विकणे परवडत नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून प्लेटमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भाव वाढला असला तरी ग्राहकांना चांगला नाश्ता देण्यावर आमचा भर आहे.
- प्रमाेद बाबनवाडे, व्यावसायिक गडचिराेली