४४ अस्थायी पदांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:32 AM2018-04-02T00:32:04+5:302018-04-02T00:32:04+5:30

वन विभागाची पुनर्रचना नवीन वन परिक्षेत्र राऊंडस् व बिट्स निर्मिती या योजनेतर योजनेतील राज्यभरातील ४५३ पदांना सन २०१८-१९ मध्ये चालू ठेवण्याबाबत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४४ पदांचा समावेश आहे.

Extension to 44 temporary posts | ४४ अस्थायी पदांना मुदतवाढ

४४ अस्थायी पदांना मुदतवाढ

Next
ठळक मुद्देलेखापाल, अधीक्षकांचा समावेश : ३९ वनरक्षकांची सेवा सात महिने राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वन विभागाची पुनर्रचना नवीन वन परिक्षेत्र राऊंडस् व बिट्स निर्मिती या योजनेतर योजनेतील राज्यभरातील ४५३ पदांना सन २०१८-१९ मध्ये चालू ठेवण्याबाबत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४४ पदांचा समावेश आहे. सदर योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ३९ वनरक्षकांची सेवा पुन्हा सात महिने सुरू राहणार आहे.
वन विभागाची पुनर्रचना नवीन परिक्षेत्र राऊंड्स व बिट्स निर्मिती या योजनेत्तर योजनेतील राज्यभरातील ४०० वर पदांना यापूर्वी १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत चालू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली होती. राज्यभरातील ४५३ अस्थायी पदे ही वन विभागाच्या २५०२५ या मंजूर आकृतीबंधात समाविष्ट असल्याने सदर पदांना सात महिन्यांची मुदतवाढ देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य शासनाने १ मार्च २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता प्रदान केली आहे. या संदर्भात राज्याच्या महसूल व वन विभागाने ३१ मार्च २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदर शासन निर्णयानुसार राज्यभरातील सर्व वनवृत्तातील एकूण ४५३ अस्थायी पदांना सात महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये विभागीय वनाधिकारी, सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल, लेखापाल, लिपीक कार्यालय अधीक्षक व वनरक्षक आदींचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक वनरक्षकांच्या २६८ पदांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. या जिल्ह्यात सागवान मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील सागवानाला देशभरातून पसंती आहे. या मौल्यवान सागवानाची व वनसंपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत ३९ वनरक्षकांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देणे आवश्यक होते. तसा निर्णय शासनाने घेतला आहे.
अशी आहेत मुदवाढ मिळालेली पदे
गडचिरोली वनवृत्तांतर्गत सिरोंचा, भामरागड, आलापल्ली, वडसा व गडचिरोली आदी पाच वन विभाग आहेत. या पाचही वन विभागांतर्गत अनेक वन परिक्षेत्र आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत ४४ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सहायक वनसंरक्षक १, लेखापाल २, कार्यालय अधीक्षक २ व वनरक्षकांच्या ३९ पदांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून काही वनमजूर व वन कर्मचारी रोजंदारी तत्वावर कार्यरत आहेत. या कर्मचाºयांच्या स्थायीत्वाचा प्रश्न कायम आहे.

Web Title: Extension to 44 temporary posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.