नोंदणीतील अडचणींमुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:05+5:302021-07-30T04:38:05+5:30
दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत; मात्र अद्यापही ...
दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत; मात्र अद्यापही वेबसाईट बंद असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
(बॉक्स)
ग्रामीण भागासाठी सीईटीची अट ठेवू नका
शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार प्रवेशासाठी अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे तर अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी वेळापत्रक नंतर जाहीर करणार असल्याची शिक्षण विभागाची माहिती आहे. ग्रामीण भागात सर्वच सेवेचे नेटवर्क समस्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश फॉर्म भरण्यास मोठी अडचण येणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सीईटीची अट न ठेवता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक करीत आहेत.