आराजी कमी असतानाही दिले अतिरिक्त पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:29 AM2020-12-25T04:29:04+5:302020-12-25T04:29:04+5:30
सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील रंगधामपेठा साजा क्रमांक १७ अंतर्गत लक्ष्मीदेवीपेठा येथे कमी आराजी असताना सुद्धा अतिरिक्त जागेेवर अतिक्रमणधारकांना पट्टे ...
सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील रंगधामपेठा साजा क्रमांक १७ अंतर्गत लक्ष्मीदेवीपेठा येथे कमी आराजी असताना सुद्धा अतिरिक्त जागेेवर अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात आले. यात माेठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार व तलाठ्यांवर प्रशासकीय व फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
लक्ष्मीदेवीपेठा येथील सर्वे क्र.३० मधील एकूण आराजी ४.९३ हेक्टर आर असताना अंकिसा येथील नसरूदीन शेख यांना दाेन हेक्टर आर., संपतराव येरवेल्ली यांना दाेन हेक्टर, राजन्ना मुलकला यांना दाेन हेक्टर आर. तर लक्ष्मीदेवीपेठा चक येथील सदानंदम पिकीली यांना १.८० हेक्टर आर. व इतर लाेकांनाही अतिरिक्त जागा देण्यात आली. यात तहसीलदार व तलाठ्यांनी संगनमत करून उपलब्ध जागेपेक्षा अतिरिक्त जागा अतिक्रमणधारकांना वाटप केली. अशाप्रकारे अनेक सर्वे नंबवर याच पद्धतीवर अतिक्रमधारकांना पट्ट्यांचे वाटप करून लाखाेंची अपसंपदा गाेळा केली. अतिक्रमण अधिनियम कायदा २००५ मध्ये बंद झालेला असतानाही तलाठ्यांनी २००८ मध्ये गाव नमूना १ ई अतिक्रमण नाेंद वहीमध्ये अतिक्रमणाची नाेंद घेऊन भ्रष्टाचार केला असल्याची बाब निदर्शनास आलेेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून संबंधित तलाठी व नायब तहसीलदार व तहसीलदारावर प्रशासकीय व फाैैजदारी कारवाई करावी, अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.लाेकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील रंगधामपेठा साजा क्रमांक १७ अंतर्गत लक्ष्मीदेवीपेठा येथे कमी आराजी असताना सुद्धा अतिरिक्त जागेेवर अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात आले. यात माेठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार व तलाठ्यांवर प्रशासकीय व फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
लक्ष्मीदेवीपेठा येथील सर्वे क्र.३० मधील एकूण आराजी ४.९३ हेक्टर आर असताना अंकिसा येथील नसरूदीन शेख यांना दाेन हेक्टर आर., संपतराव येरवेल्ली यांना दाेन हेक्टर, राजन्ना मुलकला यांना दाेन हेक्टर आर. तर लक्ष्मीदेवीपेठा चक येथील सदानंदम पिकीली यांना १.८० हेक्टर आर. व इतर लाेकांनाही अतिरिक्त जागा देण्यात आली. यात तहसीलदार व तलाठ्यांनी संगनमत करून उपलब्ध जागेपेक्षा अतिरिक्त जागा अतिक्रमणधारकांना वाटप केली. अशाप्रकारे अनेक सर्वे नंबवर याच पद्धतीवर अतिक्रमधारकांना पट्ट्यांचे वाटप करून लाखाेंची अपसंपदा गाेळा केली. अतिक्रमण अधिनियम कायदा २००५ मध्ये बंद झालेला असतानाही तलाठ्यांनी २००८ मध्ये गाव नमूना १ ई अतिक्रमण नाेंद वहीमध्ये अतिक्रमणाची नाेंद घेऊन भ्रष्टाचार केला असल्याची बाब निदर्शनास आलेेली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून संबंधित तलाठी व नायब तहसीलदार व तहसीलदारावर प्रशासकीय व फाैैजदारी कारवाई करावी, अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.