गॅस वितरकाकडून अतिरिक्त पैशाची वसुली

By admin | Published: July 8, 2016 01:28 AM2016-07-08T01:28:12+5:302016-07-08T01:28:12+5:30

येथील पवन गॅस वितरकाकडून आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्या जात असल्याची तक्रार...

Extra Money Recovery by Gas Distributor | गॅस वितरकाकडून अतिरिक्त पैशाची वसुली

गॅस वितरकाकडून अतिरिक्त पैशाची वसुली

Next

एटापल्लीतील प्रकार तहसीलदाराकडे तकार
एटापल्ली : येथील पवन गॅस वितरकाकडून आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्या जात असल्याची तक्रार आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार तथा कार्याध्यक्ष प्रज्वल नागुलवार यांनी एटापल्ली तहसीलदारांकडे केली आहे.
या तक्रारीत नागुलवार यांनी म्हटले आहे की, एका गॅस सिलिंडरची किमत ६२५ रूपये असताना त्याच सिलिंडरसाठी कर्मचारी व दिवानजी ६४० रूपये घेत आहेत व ६२५ रूपयांची पावती ग्राहकाला देत आहे. एक सिलिंडरवर १५ रूपयांची लुबाळणूक करण्यात येत आहे. वन विभागाकडून ४६० रूपये लाभार्थी गॅससाठी दिले जात आहे. तर जनतेकडून १६५ रूपये घ्यायला हवे, मात्र अशा ग्राहकांकडून १८० रूपये घेतले जात आहे. सुशिक्षीत बेरोजगारांकडून ३० रूपये लुटल्या जात असून एटापल्ली तालुक्यातील अशिक्षीत आदिवासींची ही फसवणूक आहे. एचपी गॅस वितरकाने ही रक्कम परत करावी, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघ व सरपंच संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही नागुलवार यांनी दिला आहे.

आपण आजपर्यंत कधीही जास्त पैसे घेतले नाही. मी सध्या बाहेरगावी आहे. दुकानातील नोकर जास्त पैसे घेत असेल तर ग्राहकांना जास्तीचे पैसे वापस करण्यात येईल व यापुढे अशी तक्रार येणार नाही, याची काळजी घेऊ.
- पवन नल्लावार, गॅस वितरक

Web Title: Extra Money Recovery by Gas Distributor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.