काेराेनाकाळात पाणपोईकडे सामाजिक संस्थांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:06+5:302021-04-29T04:28:06+5:30

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ...

The eyes of social organizations on Panapoi during the Kareena period | काेराेनाकाळात पाणपोईकडे सामाजिक संस्थांचा कानाडोळा

काेराेनाकाळात पाणपोईकडे सामाजिक संस्थांचा कानाडोळा

googlenewsNext

दरवर्षी उन्हाळा सुरू होताच गावोगावी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाणपोया सुरू केल्या जात होत्या. वाटसरूंची तृष्णा तृप्ती व्हावी, ही यामागची चांगली भावना होती म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी प्याऊ लावताना दिसत होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन, संचारबंदी आदींमुळे रहदारी, नागरिकांची संख्या कमी झाली आहे. मात्र, इतर कालावधीत नागरिकांची बसस्टॅण्ड, कार्यालये आदी ठिकाणी नागरिक ये-जा करत असतात. त्यावेळी नागरिकांना तहान भागविण्यासाठी पाणपोईची नितांत गरज असते. काही वेळा उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या असते, तरी पण पाणपोया लागायच्या. आता मात्र पाणपोया शहरासह तालुक्यात दिसेनाशा झाल्या आहेत. काही वेळा राजकारणी मंडळी फोटोसेशनपुरती पाणपोई सुरू करायचे, नंतर पाणपोईकडे दुर्लक्ष करायचे. असे अनेकदा घडले. कारण काय तर पाणपोईसाठी एक मजूर, माठ, ग्लास आदींचा खर्च येतो. यामुळे पाठ फिरवली जात आहे. सामाजिक भावनेतून पाणपोई लावणे आता लुप्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले हॉटेलसुद्धा बंद आहेत, त्यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Web Title: The eyes of social organizations on Panapoi during the Kareena period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.