आरमोरीत होणार व्यायामशाळेची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:30 AM2016-10-19T02:30:29+5:302016-10-19T02:30:29+5:30
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायामशाळा
आमदार निधीतून आर्थिक मदत : युवकांसाठी झाले सोयीचे
आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या व्यायामशाळेचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोेरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शेखर मने, तेजराव बोरकर, आनंद हेमके, रमेश घाटे, तुळशिराम गोंधोळे, गुलाब मने, शंकर सातव, गणेश वनवे, नंदू नाकतोडे, पंकज खरवडे उपस्थित होते.
आरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असतानाही आरमोरीत व्यायामशाळा उपलब्ध नसल्याने युवकांना शारीरिक कसरत करण्यासाठी अडचण जात होती. पोलीस, वनरक्षक, सीआरपीएफ, एसआरपीएफ यासारख्या भरतींसाठी शारीरिक कसरत आवश्यक असल्याने कार्यशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यायामशाळेचे निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. संचालन मुरवतकर तर आभार संदीप दहिकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील धात्रक, युगल सामृतवार, राहुल तितीरमारे, महेंद्र शेंडे, चंदू आकरे, संजय सोनटक्के, राकेश मने, गोलू वघारे, मुकेश मेश्राम, सागर मने, फुलबांधे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)