पीककर्ज घेण्यासाठी केसीसी पोर्टलद्वारे सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:23+5:302021-07-05T04:23:23+5:30

शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी ...

Facility for taking peak loans through KCC portal | पीककर्ज घेण्यासाठी केसीसी पोर्टलद्वारे सुविधा

पीककर्ज घेण्यासाठी केसीसी पोर्टलद्वारे सुविधा

Next

शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी २०२०-२१ खरीप हंगामात या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण सादर केले, अशा अर्जदारांना पुन्हा २०२१-२२ खरीप हंगामाकरिता कर्ज मागणी करायची असेल, तर फक्त नूतनीकरण या एका क्लिकचा वापर करून अर्ज भरता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी kccgad.com या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

बँकांकडून शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अकारण नाकारणे तसेच टाळाटाळ करणे यासारख्या प्रकारावर आता जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. तसेच पोर्टलद्वारे शेतकऱ्यांनी किती अर्ज केले, बँकांनी किती पात्र ठरविले किंवा नाकारले, यावर सनियंत्रण राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना इंटरनेट किंवा पोर्टल वापरण्याची सुविधा नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा गावस्तरावरील आत्माचे शेतकरी मित्र, बँक सखींची मदत घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

बाॅक्स

असा करावा अर्ज...

शेतकऱ्यांनी kccgad.com या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर आवश्यक सूचना वाचाव्यात. ‘क्लिक हिअर टू अप्लाय’वर जावे. पोर्टलद्वारे यापूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ नूतनीकरण करावे लागणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘न्यू’वर क्लिक करून अर्ज सादर करावा. आवश्यक माहिती भरून अर्ज ऑनलाईन जमा करावा. सदर अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर तो पुन्हा वाचून सबमिट करावा. त्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून बँकेत आवश्यक कागदपत्रांसह जमा करावे. अर्ज सादर केल्याची पावती अथवा पोहाेच घ्यावी. यानंतर पुन्हा बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या पीक कर्जाच्या अर्जाचा तपशील ‘क्राॅप लाेन अप्लिकेशन स्टेटस’ या माेबाईल ॲपवरही पाहता येईल.

Web Title: Facility for taking peak loans through KCC portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.