बनावट फेसबुकने पैशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:47 AM2021-02-05T08:47:52+5:302021-02-05T08:47:52+5:30
समीर गुप्ता यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने फेसबुक अकाउंट तयार केले. केवळ पाच तासात तब्बल १५० मित्र बनविले. आपल्याला ...
समीर गुप्ता यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने फेसबुक अकाउंट तयार केले. केवळ पाच तासात तब्बल १५० मित्र बनविले. आपल्याला पैशाची गरज असल्याचे सांगून अज्ञात व्यक्ती गुप्ता यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी करीत हाेता. त्यासाठी त्याने स्वत:चा फाेन पे क्रमांकही दिला हाेता. गुप्ता यांचे मित्र असलेल्या एका पाेलीस उपनिरीक्षकाने फाेन पे वर पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अज्ञात व्यक्तीने दिलेला माेबाइल नंबर गुप्ता यांचा नसून ताे प्रकाशचंद शर्मा यांचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच गुप्ता यांना फाेन करून विचारले असता, मी तर पैसे मागितलेच नाही, असे गुप्ता यांनी सांगितले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर काही वेळात इतर मित्र व नातेवाइकांचेही पैसे मागितल्याने फाेन यायला सुरुवात झाली. गुप्ता यांनी स्वत:च्या फेसबुकवर सूचना टाकून इतर मित्र परिवाराला सावध केले. सुदैवाने त्या अज्ञात व्यक्तीला कुणीही पैसे दिले नाही. त्यामुळे पुढची माेठी समस्या टळली. गुप्ता यांनी याबाबत काेरची पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, तसेच बनावट अकाउंट रद्द करण्यासाठीही अर्ज केला आहे.