रबी पिकाच्या उत्पन्नात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:17 AM2019-03-23T01:17:03+5:302019-03-23T01:18:28+5:30

चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा आहे. येथील शेतजमीन खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

Falling in the income of rabi crops | रबी पिकाच्या उत्पन्नात घसरण

रबी पिकाच्या उत्पन्नात घसरण

Next
ठळक मुद्देशेतकरी संकटात : लागवडीचा खर्च भरून निघेना

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा आहे. येथील शेतजमीन खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेतात. सध्या रबी पिकाची काढणी आटोपली असून मळणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रबी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. दरवर्षीच्या रबी हंगामात दाणे भरीत असताना वातावरणात झालेला बदल व अवकाळी पावसाचा फटका बसत असल्याने खरीप पेक्षा रबी हंगामातील उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता अधिक असते. यंदाच्या रबी हंगामात चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकाची लागवड केली. विशेष म्हणजे, या तालुक्यात लाखोळी व तूर हे पीक प्राधान्याने घेतले जाते. सदर दोन्ही पिके ऐन गर्भात असताना ढगाळी वातावरणाचा फटका या पिकांना बसला. परिणामी कडधान्याचे उत्पादन २५ टक्के झाल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मजुरांच्या मजुरीचा खर्च तसेच लागवडीचा इतर खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या वैरणाची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कडधान्य पिकाची मळणी केली. मळणीचाही खर्च आता दिवसेंदिवस वाढत असून रबी पिकातील लागवड शेतकºयांना आणखी संकटात टाकत असल्याचे दिसून येते.

Web Title: Falling in the income of rabi crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.