निरोप देणे हा भारतीय संस्कृतीचा भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:24 AM2019-05-01T00:24:07+5:302019-05-01T00:24:28+5:30
जाणाऱ्यांना निरोप देणे हा फक्त शिष्टाचार नाही तर तो संस्कृतीचा भाग आहे, असे प्रतिपादन यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरूण हरडे यांनी केले. स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात शनिवारला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : जाणाऱ्यांना निरोप देणे हा फक्त शिष्टाचार नाही तर तो संस्कृतीचा भाग आहे, असे प्रतिपादन यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरूण हरडे यांनी केले.
स्थानिक केवळराम हरडे कृषी महाविद्यालयात शनिवारला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य संजय भांडेकर, प्रा. गणेश दांडेकर, प्राचार्य डॉ. दिनेश सुरजे, प्रा. तुषार भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी पदवीच्या प्रथम सत्रापासून सातव्या सत्रापर्यंत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण मुलांमधून प्रथम क्रमांक धनंजय सुरेश ठिकरे, द्वितीय क्रमांक पवन हिराचंद कुनघाडकर, तृतीय क्रमांक पराग शंकर सहारे, मुलींमधून प्रथम क्रमांक युगा अरूण झाडे, द्वितीय क्रमांक सुषमा चंद्रकुमार कठाणे व तृतीय क्रमांक अर्पिता पिसाराम नंदेश्वर यांनी पटकाविला. या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कृषी पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेशपात्रता परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाºया अनिकेत सुधाकर झाडे, मधुगंधा गौतम जुलमे, सुरज देवराव सातपुते, मोहनदास शिवाजी शेंडे, अर्पिता पिसाराम नंदेश्वर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाबत मनोगत व्यक्त केले.
संचालन छबील दुधबळे तर आभार गुणेश चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीकांत सरदारे, अभिजीत उप्परकर, किशोर गहाणे, रूपेश चौधरी, गुणेश चोचरे, प्रा. पल्लवी भांडेकर, शारदा दुर्गे, शुभांगी मरस्कोल्हे, दामिनी मेश्राम, दीपाली डाहुले, श्याम भैसारे, दत्तू उराडे, संतोष पांचलवार, देवराव ठाकरे, यशवंत भरणे, अनिल घोंगडे, महेश मुत्तेवार, पौर्णिमा सालेकर, जगन्नाथ पेशट्टीवार, सूरज बावणे, प्रवीण करिंगलवार, विजय किरमे, हिवराज चिमरवार, मधुकर पिटाले, विशाल गेडाम, राहुल खर्डेवार, संजय येनुगवार, मरियम मिंज, सीमा मंडल, मनीषा सयाम, मंजूषा उराडे यांनी सहकार्य केले.