शेतकरी गटांना कृषी अवजारे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:42+5:302021-04-29T04:28:42+5:30
सन २०२१ या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना भात कापणी यंत्र उपलब्ध करून देण्याची योजना असून त्यात शेतकरी ...
सन २०२१ या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना भात कापणी यंत्र उपलब्ध करून देण्याची योजना असून त्यात शेतकरी उत्पादक कंपन्या महिला शेतकरी बचत गट शेतकरी बचत गट सेंद्रिय शेती बचत गट अर्ज करू शकतात तर विविध कृषी उपकरणे उपलब्ध करून देण्याचे योजनेत राईस डी हास किंग मशीन, भात झाडणे यंत्र, बहुपीक टोकण यंत्र, स्वयम रोजगार किट हस्त चलित कडबा कट अडकित्तात्या आदी साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता धानोरा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील नोंदणीकृत गटांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण कागदपत्रासह १० मे २०२१ पर्यंत तालुका कृषी अधिकारी धानोरा यांचेकडे सादर करावे
या योजनेतील उपकरणाकरीता ९० टक्के अनुदान असून १० टक्के शेतकरी गटाचा हिस्सा राहील. तरी अनुसूचित जमातीचे नोंदणीकृत शेतकरी गटांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पाल यांनी केले आहे.