पाेटगाव येथे शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:33 AM2021-02-15T04:33:00+5:302021-02-15T04:33:00+5:30
गडचिराेली : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत, जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२०-२१ ‘शेतकरी प्रशिक्षण’ पाेटगाव येथील दिगांबर रणदिवे यांच्या ...
गडचिराेली : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत, जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रम २०२०-२१ ‘शेतकरी प्रशिक्षण’ पाेटगाव येथील दिगांबर रणदिवे यांच्या शेतात घेण्यात आले. गावातील जमिनीच्या सुपिकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा याविषयी माहिती देण्यात आली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी सहाय्यक स्वाती दौरेवार, कृषी सहाय्यक प्रेमज्योती मेश्राम आदी उपस्थित हाेते. यावेळी माती परीक्षणाचे महत्व व माती नमुना कसा काढायचा, या विषयी माहिती देण्यात आली. कृषी पर्यवेक्षक युगेश रणदिवे यांनी भाजीपाला पिकावरील रोग व किडीच्या उपाययोजना बद्दल माहिती दिली. सी.जी.ताडपल्लीवार यांनी जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रमाचे प्रास्ताविकाव्दारे माहिती दिली. आभार कृषी सहाय्यक सुधाकर कोहळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी गावातील शेतकऱ्यांसह कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे, कोटांगले व कृषी सेवक तुषार टिचकुले यांनी सहकार्य केले.