शेतकºयांनो, हक्कासाठी कारागृहात जाण्याची तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:23 AM2017-08-12T01:23:39+5:302017-08-12T01:24:15+5:30
शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे. नैसगिक धोके शेतकरी स्वीकारतात. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडूनही शेतकºयांसाठी धोके निर्माण केले जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारच्या विरोधात शेतकºयांच्या हक्कासाठी आंदोलन उभारण्याची आता गरज आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते तथा माजी आमदार किसान मंच समिती महाराष्टÑाचे संयोजक तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे पाटील यांनी केले.
किसान मंचच्या वतीने शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये शेतकरी व शेतमजूर मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार होते. यावेळी मंचावर किसान मंचच्या कार्यकारी समितीचे सदस्य किशोर माथनकर, दत्ता पवार, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्णे, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, नामदेव गडपल्लीवार, प्रकाश ताकसांडे, अॅड. संजय ठाकरे, माजी नगरसेवक विजय गोरडवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारकडून भारतातील ६८ पिकांचे शोषण होत आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर भात, दुसºया क्रमांकावर ज्वारी त्यानंतर इतर पिकांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, ऊस पीक उत्पादक शेतकºयांचे आजवर कधीही सरकारकडून शोषण झाले नाही. विद्यमान सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून कृषी क्षेत्रात जाणीवपूर्वक उपद्व्याप सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा असुरक्षित व निराधार झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व न्यायाकरिता महाराष्टÑात किसान मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचच्या माध्यमातून सरकारला शेतकºयाच्या हिताचे निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. हे आंदोलन लवकरच होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे नेते व शेतकºयांनी कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी किशोर माथनकर, दत्ता पवार, अतुल गण्यारपवार, जगन्नाथ बोरकुटे आदींनी शेतकºयांच्या दयनिय परिस्थितीवर प्रकाश टाकून विद्यमान भाजपप्रणित सरकार शेतकºयांप्रती सकारात्मक नाही, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश ताकसांडे, संचालन माजी नगरसेवक विजय गोरडवार यांनी केले. कार्यक्रमाला महेंद्र ब्राह्मणवाडे, विवेक ब्राह्मणवाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
सरकार निगरगट्टच
माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात भात व इतर कृषी शेतमालात भारत देश आघाडीवर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान मोठ-मोठी आश्वासने दिली. पंतप्रधान झाल्यावर अनेक घोषणा केल्या. मात्र एकही घोषणा पूर्णत्वास आली नाही. शेतकºयांच्या शेतमालाला ५० टक्के नफा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनही केंद्र सरकारने पाळले नाही. शेतकºयांच्या प्रती एवढे निगरगट्ट सरकार आपण कधीही पाहिले नाही, असे शंकरअण्णा म्हणाले.