४० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:46 AM2018-03-07T01:46:26+5:302018-03-07T01:46:26+5:30

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरात सुमारे ४० शेततळे खोदण्यात आले आहेत. या शेततळ्यांमुळे भूर्गभातील पाणीपातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Farmers benefit from 40 farmers | ४० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ

४० शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देपिकांना नवसंजीवनी : लखमापूर बोरी परिसरात सिंचनाची सुविधा वाढण्यास मदत

ऑनलाईन लोकमत
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरात सुमारे ४० शेततळे खोदण्यात आले आहेत. या शेततळ्यांमुळे भूर्गभातील पाणीपातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लखमापूर बोरी परिसरातील वाकडी येथील २०, नवीन वाकडी येथील १० व लखमापूर बोरी येथील १० शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे खोदून देण्यात आले आहेत. लखमापूर बोरी परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरात कन्नमवार जलाशयाचे पाणी येते. मात्र कधीकधी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी एका पाण्याने पीक मरते. आकस्मिक स्थितीत शेततळ्याचे पाणी वापरता येत असल्याने पिकांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने शेतकरी शेतात शेततळे खोदण्यास पसंती दर्शवित आहेत. विशेष म्हणजे १०० टक्के अनुदानावर शेततळ्यांचे खोदकाम केले जात असल्याने शेतकरी शेततळे खोदण्यास तयार होत आहेत.

Web Title: Farmers benefit from 40 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.