बाेनसची रक्कम न मिळाल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:13+5:302021-05-17T04:35:13+5:30
२०२० ते २०२१ या सत्रात हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन खरीप हंगाम पूर्ण करण्यात आला. दुष्काळाशी सामना करून शेतकऱ्यांनी ...
२०२० ते २०२१ या सत्रात हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन खरीप हंगाम पूर्ण करण्यात आला. दुष्काळाशी सामना करून शेतकऱ्यांनी काही उत्पादन घेतले. शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी जिल्ह्यात आदिवासी महामंडळ, फेडरेशनमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्यात आली. डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला. मात्र, अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. महाराष्ट्र शासनाने प्रतिक्विंटल धान खरेदीवर ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. ३१ मार्चपर्यंत धान खरेदी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. मात्र, एप्रिल महिना लोटून गेला तरी शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत. सध्या कोरोना महामारी सुरू असल्यामुळे कामधंदे बंद पडून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्यामुळे यावर्षी बोनस मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर गदा येऊ न देता शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना बोनसची रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.