जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी न केल्यास आंदाेलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:31+5:302021-04-01T04:37:31+5:30
महाविकास आघाडी सरकारने धान खरेदीकरिता किचकट प्रक्रिया राबविल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला, तसेच फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत ...
महाविकास आघाडी सरकारने धान खरेदीकरिता किचकट प्रक्रिया राबविल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला, तसेच फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात यावर्षी वेळीच गाेदामाची व्यवस्था करण्यात आली नाही. यासह अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपले धान विक्री करण्यापासून वंचित राहिले. जिल्ह्यातील शेतकरी धान विक्री करू न शकल्यामुळे हवालदिल झाले. हजारो शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीकरिता आपला सात-बारा दिला. नंबर न लागल्याने ज्या शेतकऱ्यांनी टाेकन मिळूनही धान विक्री केली नाही. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी मुदत वाढवून द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी दिला आहे. १ एप्रिलला कृषी उत्पन्न बाजार समितीत आदिवासी विकास महामंडळ व फेडरेशन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आ. हाेळी यांनी म्हटले आहे.