शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:21 AM2018-10-06T01:21:22+5:302018-10-06T01:22:48+5:30

सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

The farmers fall on the district crews | शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोगावच्या उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सद्य:स्थितीत धानपिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही गोगाव येथील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोंबर शनिवारपासून सिंचन योजनेतून शेतीला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
गोगावनजिकच्या वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गोगाव येथील ३५० ते ४०० एकर शेत जमिनीस सिंचनाची सुविधा निर्माण होऊ शकते. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी शेतीत धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने जमिनीस भेगा पडून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीकरिता शेतकऱ्यांनी ६ आॅगस्ट व १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन सादर केले होते. मात्र शेतजमिनीला पाणी सोडण्यात आले नाही.
हाती येणारे पीक डोळ्यादेखत करपत असल्याचे बघून संतप्त झालेल्या अनेक शेतकºयांनी शुक्रवारी सीताराम टेंभूर्णे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गोगांव उपसा सिंचन योजनेतून तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोंबरपासून पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सीताराम टेंभूर्णे, लोमेश लाडे, भास्कर मुनघाटे, केवळराम नंदेश्वर, रमेश वनकर, तुळशीराम मानकर, भगवान गेडाम, दिवाकर राउत, हिरामण उंदीरवाडे, पेवानंद चुधरी, तुळशीराम मेश्राम, कृष्णानंद भरडकर, चंद्रशेखर भरडकर, बापूजी दिवटे, मारोती दिकोंडावार, महेश ठोंबरे, शामराव चिचघरे, सुनील बांगरे, दिवाकर बांगरे, धरमदास म्हशाखेत्री, मीना बाबनवाडे, विजय म्हशाखेत्री, नानाजी चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: The farmers fall on the district crews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.