धान जगविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड
By admin | Published: September 30, 2015 04:59 AM2015-09-30T04:59:25+5:302015-09-30T04:59:25+5:30
गडचिरोली जिल्ह्यात धान, सोयाबिन पीक प्रचंड उष्णतेमुळे करपायला लागले आहे. या परिस्थितीत पीक
वैरागड : वैरागड परिसरात ताप रूग्ण वाढले. या बाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली. आरोग्य विभागाचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वैरागडला भेट देऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ताप नियंत्रणासाठी उपाययोजनाही सुचविल्या.
मागील आठ दिवसांपासून वैरागड व परिसरात मोठ्या प्रमाणावर रूग्ण दवाखाण्यात दाखल होते. २८ सप्टेंबरला प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रूग्ण विभागात २०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. रूग्णांची संख्या दररोज वाढत चालली होती. वैरागड येथे पुंडलिक बोधनकर या डेंग्यू आजाराचा संशयीत रूग्ण असल्याचे लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. याची दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोटे यांनी वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली व तापावर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच गावागावात फिरून रूग्णांची तपासणी करण्याबाबत निर्देश यंत्रणेला दिले.
आरोग्य विभागाचे १२ कर्मचारी घरोघरी जाऊन रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करीत आहेत व प्राथमिक उपचार कसे करायचे याबाबत माहिती देत आहेत, असे डॉ. मोटे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या प्रमुख डॉ. शुभदा देशमुख यांनीही वैरागडला भेट देऊन येथील ताप रूग्णांची माहिती जाणून घेतली. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते यांनी तापाच्या वाढत्या रूग्णांबाबत चिंता व्यक्त करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. (वार्ताहर)