शेतकऱ्यांची कुरखेडा वीज कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:19 AM2018-10-07T01:19:42+5:302018-10-07T01:20:12+5:30
भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले.
मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धान पिकाला मोटार पंपाच्या सहाय्याने पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र भारनियमण केले जात असल्याने धानपिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. पाण्याअभावी काही शेतकऱ्यांचे पीक करपायला लागले आहे. हातात आलेले पीक नष्ट होतांना बघून शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकºयांची गरज लक्षात घेऊन भारनियमण रद्द करावे या मागणीसाठी आदीवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात कुरखेडा येथील उपविभागीय अभीयंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मालेवाडा येथील वीज कार्यालयाची तोडफोड केल्याची तक्रार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे काही युवकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. हा अन्याय असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. स्थानिक गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. लोडशेडींग बंद करावी अशा घोषणा शेतकरी देत होते. मागण्यांचे निवेदन गडचिरोली विभागीय कार्यालयाचे अभियंता तेलतुंबडे व कुरखेडाचे उपविभागीय अभियंता मुरकुटे यांनी स्विकारले.
मोर्चाचे नेतृत्व आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष जयंत हरडे, साबु सेठ, दौलत कुमोटी, आनंद बोगा, माजी पं. स. सदस्य उमाकांता मडावी, सरपंच शशीकला कुमरे, तुलसी हारामी, किरण तलांडे, उपसरपंच मनेश लेनगुरे, सुरेखा वनक्षकर, जागृती मडावी, दिलीप नैताम, सदाराम काटेंगे, जगदीश बद्रे, महादेव हिळका,े शालीक मडावी, रु षी हलामी, सदु हलामी, शेषराम मसराम, आनंद कपूर, श्रावन कसनकर, हिरामन लंजे, वासुदेव डोगंरवार, निलकंठ गावळ, सोमनाथ मसराम, लक्ष्मन डोगंरवार, मुस्तफा शेख, अशोक टेंभुर्णे, जाणू मडावी, शामराव नरोटे, अंताराम गोटा, मानीक कमरो, चमरु भैसा, हरीपाल ताफा, सूरजू पुराम, हरीश्चंद्र ढोरे, मन्साराम नैताम, नामदेव धुर्वै यांनी केले. ठाणेदार सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.