शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:28+5:30

सोमवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिरोंचाच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन ही गंभीर समस्या तहसीलदारांना सांगितली. यावेळी राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, तालुका उपाध्यक्ष रवींद्र सल्लम, नगर पंचायतीचे सभापती सतीश भोगे, कमलाकर रेगू, महेकल चेकला, नगम पिल्ला, व्यंकटी कोठारी, नरेश संगती, व्यंकटेश गौरारपू, चेकला पापय्या, नागेश पापय्या, श्रीनिवास चेकला यांच्यासह बहुसंख्य बाधित शेतकरी उपस्थित होते.

The farmers hit the tehsil | शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देमेडीगड्डा प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान : भरपाई द्या, अन्यथा चक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा सरकारच्या वतीने ेमेडीगड्डा प्रकल्प साकारण्यात आला. मात्र या प्रकल्पाच्या पाण्यामुळे नदीपात्रानजीकच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान, कापूस, मिरची व भाजीपाला पिकांमध्ये ऐनवेळी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
सोमवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिरोंचाच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन ही गंभीर समस्या तहसीलदारांना सांगितली. यावेळी राकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, तालुका उपाध्यक्ष रवींद्र सल्लम, नगर पंचायतीचे सभापती सतीश भोगे, कमलाकर रेगू, महेकल चेकला, नगम पिल्ला, व्यंकटी कोठारी, नरेश संगती, व्यंकटेश गौरारपू, चेकला पापय्या, नागेश पापय्या, श्रीनिवास चेकला यांच्यासह बहुसंख्य बाधित शेतकरी उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेडीगड्डा प्रकल्पाची उभारणी करताना तेलंगणा सरकारला महाराष्ट्र सरकारने कोणत्याही अटीशर्ती लावल्या नाही. सरसकट संमत्ती दिली. सदर प्रकल्पाला शेतकरी व राष्ट्रीय पक्षांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र दखल घेण्यात आली नाही. आता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे पाणी सिरोंचा तालुक्याच्या शेतजमिनीमध्ये शिरत आहे. परिणामी शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पालकमंत्र्यांना साकडे
मेडीगड्डाबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मोबदला देण्यात यावा तसेच पाणी साठवण पातळी कमी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आली आहे.

Web Title: The farmers hit the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा