शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:56 PM2018-11-12T22:56:06+5:302018-11-12T22:56:25+5:30

भारतीय किसान संघ तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास १२०० शेतकरी सहभागी झाले होते.

Farmers hit the tehsil | शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

Next
ठळक मुद्देकृषी यंत्रांवर ५० टक्के सूट द्या : भारतीय किसान संघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : भारतीय किसान संघ तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास १२०० शेतकरी सहभागी झाले होते.
विठ्ठलेसर मंदिरापासून मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला. सिरोंचा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. यावेळी उपस्थित नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाकून टीका केली. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व भारतीय किसान संघ तालुका सिरोंचाचे अध्यक्ष श्रीहरी अरिगेला, रमेश मंडाळे, रमेश मंडाळे, जिल्हाध्यक्ष रमेश उप्पलवार, रामन्ना तोटावार, चंद्रशेखर पुलगम, शिवशंकर अरिगेला, रमेश दुधीवार, रमेश चिंता, समय्या नेरकरी, मेचनेती मोहनराव, प्रकाश चकिनारपुवार, कोंडया गणपुरपू, धर्मया कोठारी आदी उपस्थित होते.
मागण्यांमध्ये शेतकºयांना दोन तास वीज पुरवठा करावा, कृषिपंपाचे संपूर्ण वीज बिल थकीत करावे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २५०० रूपये अनुदान द्यावे, सिरोंचा तालुक्यातील शेतकºयांना शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम बांधून द्यावे, शेती यंत्र ५० टक्के सुटीवर द्यावी, दुग्ध संकलन केंद्र निर्माण करावे, ९० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन सुविधा निर्माण करावी, कृषियंत्रांना ५० टक्के अनुदानावर इंधन पुरवठा करावा, कर्जाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Farmers hit the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.