शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 06:00 AM2020-12-06T06:00:00+5:302020-12-06T06:00:02+5:30
या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर हा कक्ष स्थापन केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकºयांना येणाºया अडचणी, तांत्रिक समस्यांचे निराकरण व आवश्यक मार्गदर्शनासाठी एक खिडकी तत्त्वावर जिल्ह्यात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. गडचिरोली येथील मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्या हस्ते झाले.
या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर हा कक्ष स्थापन केला जाणार आहे. या शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षामध्ये शेतकºयांच्या मदतीसाठी जनसंपर्क व मार्गदर्शन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सदर अधिकारी शेतकºयाला आवश्यक मदत संबंधित विभागाच्या शाखेकडून करणार आहेत. मार्गदर्शन कक्षाला भेट देणाºया शेतकºयांची माहिती व त्यांच्या समस्या, केलेली मदत याबाबत नोंदी ठेवल्या जाणार आहेत. या कक्षात शेतकºयांना आवश्यक माहिती पुस्तिका, वाचन साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. शेतकºयांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्याकरिता शासनाच्या विविध यंत्रणांकडून शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधून या कक्षामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. या ठिकाणी संगणीकृत शेतीविषयक माहिती देणारे यंत्रही बसविण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी कार्यालय, गडचिरोली येथे कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तालुकास्तरावर समन्वय समिती
समस्यांचे निराकरण करण्याकरिता तालुकास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत अध्यक्ष तहसीलदार, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, पं.स. पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन उपअभियंता, कृषी विद्यापीठ/संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रतिनिधी, पं.स.कृषी अधिकारी मत्स्य उद्योग, रेशीम, खादी ग्रामोद्योग, विभागाचे प्रतिनिधी, एमएसईबी अभियंता, लीड बँक प्रतिनिधी, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक, कृउबासचे सचिव, एका महिला शेतकºयासह किमान तीन प्रगतशील शेतकरी आदींचा समावेश आहे.