कुरखेडा तालुक्यातील शेतकरी वीज मीटरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:27+5:302021-07-05T04:23:27+5:30
सन २०१६ - २०१७ मध्ये शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरवेल तसेच मोटारपंपाची योजना मिळाली होती. ...
सन २०१६ - २०१७ मध्ये शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरवेल तसेच मोटारपंपाची योजना मिळाली होती. आपल्या शेतातीत पीक वाचविण्याकरिता ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असतानासुद्धा सदर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने, कर्जबाजारी बनलेला शेतकरी आता हतबल झाला आहे. वीज जोडणीसाठी शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयात जात आहेत. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी झाली असती, तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला तसेच इतर पीक घेऊन आपला आर्थिक स्रोत वाढविला असता. पण महावितरण कंपनीच्या विलंबाच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. डोळ्यांसमोर असलेल्या वस्तूंचा आपण गेल्या दोन वर्षांपासून काहीही उपयोग करत नाही, याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.